अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही?, सर्वोच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थांना एक वर्ग परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र यामध्ये अंतिम वर्षाच्या मुलांच्या  परीक्षा होणार हे सांगितलं गेलं होतं. राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या मुलांच्या परीक्षा आम्ही घेणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर याचा अंतिम निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

एकवेळ परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात येईल मात्र परीक्षा होणार असून राज्यांनी परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात सांगितलं आहे.

एखाद्या राज्याने जर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्या राज्यांना  युजीसीकडे दाद मागण्याचा पर्याय असून ते तारीख पुढे ढकलण्याची मागणी करू शकत असल्याचंही सर्वोच्च्न न्यायालयाने म्हटलं आहे. या विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. या परीक्षांच्या आधारेच ते विविध क्षेत्रांत विशेष ज्ञान प्राप्त करतात. अंतिम वर्षांच्या परीक्षा या परीक्षा विद्यार्थ्यांचे संपुर्ण आयुष्यालाकालटणी देणाऱ्या असतात.

अंतिम वर्षांच्या परीक्षा विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी आत्मविश्वास देतात. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे गरजेचं असून सीबीएसई, आयसीएसई परीक्षांची तुलना त्यांच्याशी केली जाऊ शकत नाही, असं आयोगाने म्हटलं होतं.

परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन किंवा संमिश्र पद्धतीने घेण्याची मुभाही आयोगाने दिली आहे.परीक्षा 30 सप्टेंबपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सूचना आयोगाने विद्यापीठांना दिल्या होत्या. यूजीसीच्या निर्देशांविरोधात आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिशा सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

दरम्यान,  राज्यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत राज्य परीक्षा पुढे ढकलून यूजीसीसोबत चर्चा करून परीक्षेची अंतिम तारीख निश्चित करावी लागणार आहे. त्यासोबतच सर्व राज्यांना 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अनिवार्य असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

महत्वाच्या बाततम्या-

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही?, सर्वोच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

“…तर पुढील 50 वर्ष कॉंग्रेसला विरोधक म्हणूनच काढावी लागतील”

रियानं अखेर सांगितला त्या ‘एयु’चा अर्थ; आदित्य ठाकरेंविषयी महत्वाचा खुलासा

‘माझ्या ड्रिंकमध्ये ‘तो’ काहीतरी मिसळून मला प्यायला द्यायचा’; बॉलीवूड क्वीन कंगनाचा धक्कादायक खुलासा

सुशांतच्या बाबतीत माझा एकच गुन्हा झाला तो म्हणजे…; रिया चक्रवर्तीनं सोडलं मौन!