पंकजा मुंडे आमच्या नेत्या, त्यांच्या आदेशाचा सन्मान- संगीता ठोंबरे

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मतदार संघात विकास कामे करता आली. सर्वसामान्य जनता आणि भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी निकासाला साथ दिली. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या आदेशाचा सन्मान असल्याचं भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादीची उमेदवारी जाहिर झालेल्या नमिता मुंडे यांनी सोमवारी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांना केज मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाली. त्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांच्या समर्थकांमधे नाराजी होती. मात्र पंकजा मुंडेंनी नाराजांची बैठक घेऊन त्यांचा समजूत काढली आहे.

केज मतदार संघातील सामान्य जनता आणि भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी आपल्याला पाठबळ आणि प्रेम दिलं. भविष्यातही या मंडळींची कामे पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून केली जातील. तसा त्यांनी शब्द दिला आहे, असं संगीता ठोंबरे यांनी म्हटंल आहे.

आपल्याला पंकजा मुंडे यांचा आदेश मान्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करू, असं सांगत त्यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. पंकजा मुंडे यांनी बीडमधील राजकारणात पुन्हा एकदा बेरजेचं गणित जुळवत राष्ट्रवादीला धक्का दिला.

नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशानंतर संगिता ठोंबरेंनी गोपीनाथ गडावर जाऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर बोलताना त्या भावूक झाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-