“अविवाहीत राहू नका, घरात बायको असली की माणसाचं डोकं शांत राहतं”

मुंबई | उद्या तुम्ही लग्न करणार आहात. करणार ना? अविवाहीत राहू नका. जेवढे आहेत तेवढ्यांनी देशाला परेशान केलं आहे. त्यामुळे लग्न करा. लग्न केल्यावर घरात बायको असली की माणसाचं डोकं शांत राहतं, असं एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

मी केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला अजिबात मानत नाही. तुम्हीही हे पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा, असं ओवैसी म्हणालेत.

एमआयएमच्या तिरंगा रॅलीची सांगता आज चांदिवली येथील सभेने झाली. या सभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला.

सेक्युलॅरिझम या शब्दाने जेवढा धोका दिला तेवढ्या कोणत्याही शब्दाने दिला नाही. ओवेसी येणार आहेत. त्यामुळे सेक्युलॅरिझमला धक्का पोहोचेल. सेक्युलॅरिझम धोक्यात येईल असं सांगितलं जात आहे. अरे सेक्युलॅरिझमचा ठेका काय तुम्हीच घेतला आहे का? असा सवालही त्यांनी केला.

तुम्हाला धर्मनिरपेक्षता दाखवली गेली. भारतातील मुसलमानांना विचारतो धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळालं? धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळालं नाही, मशीद मिळाली नाही. मशिद पाडणाऱ्यांनी शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही. पण तरीही आपण धर्मनिरपक्षेतेला भुलतो. केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. मी पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला कधीच मानत नव्हतो आणि मानणार नाही. मुसलमानांनो पॉलिटिकल सेक्सुलॅरिझम धुडकावून लावा. तुम्हाला शासन कर्ती जमात बनायचं आहे, असं ओवैसी म्हणाले.

ओवैसींनी राज्यातील महाविकास आघाडीवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. कुठे आहे आरक्षण? तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही. तुम्ही कुणालाही मतदान करावं हा तुमचा हक्क आहे. पण तुम्ही कधीपर्यंत फसवले जाणार आहात. बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईत हिंसाचार झाला त्यानंतर तरी तुमचे डोळे उघडायला हवे होते. पण तुम्ही सर्व विसरला, असं ओवैसी म्हणाले.

महाराष्ट्रात 33 मुस्लिमांकडे जमीन नाही. तर फक्त एक टक्का मराठ्यांकडेच जमीन नाही. हा कोणता न्याय आहे? ही विसंगती असतानाही शरद पवारांना केवळ मराठ्याचा कळवळा का आहे? उद्धव ठाकरेंनाही मराठ्यांचा एवढा कळवळा का?, असा सवाल त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं हा इतिहास आहे” 

मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज; उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  ओ

“बाळासाहेब असते तर संज्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं” 

“शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं”

“मोठा भाऊ म्हणून आम्ही आदर करू, पण हे खपवून घेतलं जाणार नाही”