“शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं हा इतिहास आहे”

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यकार्यक्रमात शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते सादर केली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांचं कौतुक केलं आहे.

शरद पवार हे पॉवर हाऊस नेते आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होते, हा इतिहास आहे. तसेच  महाराष्ट्रात, देशात माणसे कशी जोडायची, हे पवारांनी शिकवलं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठवाडा विद्यापीठ नामकरण, महिलांचे आरक्षण तसेच महाविकास आघाडी निर्माण करण्याचा निर्णय आदी महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. यामुळे परिवर्तन झाले. देशातील कोणत्याही नेत्याला त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागते, असं जयंत पाटील म्हणालेत.

विद्यार्थी राष्ट्रवादीला आम्ही एवढेच सांगतो की, 2024 चा विचार करू नका. त्यापुढचा विचार करा. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातल्यांशी संवाद साधावा. काँग्रेस पक्षाने सेवादल नावाची संघटना स्थापन केली. महात्मा गांधींचा विचार त्यामागे होता, असंही पाटील यांनी सांगितलं.

पवारांचा वाढदिवस म्हणजे महाराष्ट्रातील जाणत्या राजाचा हा वाढदिवस. शेतकऱ्यांच्या पाठिराख्याचा हा वाढदिवस. वंचित घटकांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा वाढदिवस. आदिवसींसाठी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा हा वाढदिवस. महिला, अल्पसंख्याकासाठी निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याचा हा वाढदिवस, असं अजित पवार म्हणालेत.

गेली 60 हून अधिक वर्ष महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या कर्मयोग्याचा हा वाढदिवस आहे. राष्ट्रवादीच्या कुटुंबप्रमुखाचा हा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावं. प्रत्येक घटकांपर्यंत पवारांचे विचार पोहोचवा. तरुणांपर्यंत त्यांचा विचार न्या, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

मी सर्वांचीच भाषण ऐकत होते. त्यांनी सांगितलं. दर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी प्रत्येक गावाला तुम्ही जायचं आहे. जे जे पहिल्या शनिवारी आपल्या गावात जाणार आहात तर तुमच्या गावातील सरपंच तरी तुमच्या विचाराचा तरी असावा. नाही तर बरेच पुढारी, देशाचं आणि राज्याचं राजकारण करतात. पण गावाचा सरपंच त्यांचं ऐकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या- 

मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज; उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

“बाळासाहेब असते तर संज्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं” 

“शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं”

“मोठा भाऊ म्हणून आम्ही आदर करू, पण हे खपवून घेतलं जाणार नाही”

राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य