पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ; पुन्हा अटकेची टांगती तलवार

नवी दिल्ली | माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या अटकेनंतर त्यांना 26 ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत आज  संपते आहे. मात्र त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. 

आज त्यांची कोठडीतून सुटका झाली तरी काही प्रकरणी ईडीला त्यांची चौकशी करायची आहे. त्यामुळे ईडीकडून त्यांना अटक होऊ शकते. 

ईडीची अटक टाळण्यासाठी त्यांनी कोठडीत असतानाच कोर्टात धाव घेतली होती. मात्र ते कोठडीत असताना यावर सुनावणी करता येणार नाही, असं कोर्टाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आता चिदंबरम यांच्या बाबतीत काय होतं, हे पहावं लागेल.

दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणी 305 कोटींच्या परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात अफरातफर केल्याचा आरोप पी. चिदंबरम यांच्यावर ठेवण्यात आला आहेत.

महत्वाच्या बातम्या-