ऑस्कर नामांकीत ‘या’ चित्रपटास प्रियांकाचा मदतीचा हात…

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या अभिनयाच्या जोरावर आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे. फक्त बॉलीवुडचं नव्हे तर हॉलीवुडमध्ये सुध्दा तिने नाव लौकिक कमावला आहे. फिल्मी जगात तिची स्व:ताची एक वेगळीचं ओळख आपल्याला पहायला मिळते.

अभिनयाबरोबर प्रियांका एक उत्तम गायक देखील आहे. ती नेहमी ईतरांना त्यांना हव्या असणाऱ्या क्षेत्रात काम करण्यास मदत करते. प्रत्येक प्रतिभावान व्यक्तीचा ती आदर करते. यावेळी ती ‘बीट्टू’ या चित्रपटाच्या    स्टारकास्टला मदत करणार आहे. या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली असुन यातील बालकलाकारांच्या अभिनयाने ती भारावुन गेली आहे.

‘करिश्मा देव दुबे’ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भुमिका साकरणाऱ्या राणी व रेणु यांनी उत्तम अभिनय केला आहे. एवढ्या लहान वयात केलेल्या अभिनयाचे सर्वांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. त्यांच्या अभिनयाचा ठसा हा सर्वांच्या मनात उमटला  गेला आहे.

ऑस्करचे नामांकन मिळण्यापुर्वी इतर अठरा चित्रपट मोहत्सवामध्ये बिट्टू हा  चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. अनेक चित्रपट मोहत्सवामध्ये त्याने अनेक पुरस्कार ही पटकावले आहेत. करिश्माला बिट्टुसाठी “सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक” हा पुरस्कारही मिळाला आहे.

या चित्रपटातील मुख्य कलाकार राणी व रेणु या मुळच्या उत्तराखंड येथील रहीवासी आहेत. या दोघीही गरीब कुटूंबातील मुली आहेत. यांना अभिनय क्षेत्रात पुढे काम करता याव म्हणुन मदत केली जाणार आहे तर त्यांना चांगल्या सुविधा देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

इंडियन वुमन रायझिंगच्या मदतीने या भागातील मुलींनाही मदत केली जाणार आहे. इंडियन वुमन रायझिंगद्वारे निधी जमा केला जात आहे. या निधीद्वारे राणी व रेणु यांच्या  शिक्षणाला हातभार लावला जाणार आहे. याचबरोबर त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

प्रियांका स्व:ता या मोहीमेद्वारे काम करणार आहे. तीने फक्त निधीचं नाही दिला तर इतरांनाही अवाहन केले आहे. स्व:ताहुन पुढे या मदत करा असेही तिने म्हटले आहे. सर्वांनी हा चित्रपट नक्की पहा. हा चित्रपट खुप सुंदर आहे. हा चित्रपट पाहुन लोक निराश होणार नाहीत असा विश्वास प्रियांकाने व्यक्त केला आहे.