इस्लामाबाद | जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांपैकी एक असलेला पाकिस्तान अनेक महिन्यांपासून आपली अर्थव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी संघर्ष करत असताना लवकरच श्रीलंकेच्या वाटेवर जाण्याची चिन्हं दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सहाय्याशिवाय पाकिस्तान इतिहासात दुसऱ्यांदा कंगाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी आता महागाईविरोधात मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिला आहे.
गव्हाच्या पीठाचे दर तात्काळ कमी करा नाहीतर मी माझे कपडे विकून लोकांना गव्हाचं पीठ पुरवेन, असं वक्तव्य शहबाझ शरीफ यांनी केलं आहे.
जर गव्हाच्या पीठाचे दर पुढच्या 24 तासांत 400 रुपयांवरून 10 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाले नाहीत तर, मी माझे कपडे विकेन आणि स्वतःला लोकांना स्वस्त पीठ उपलब्ध करून देईन, असं शरीफ म्हणाले आहेत.
दरम्यान, मागिल काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केले होते. भारताच्या शेजारचा असणारा पाकिस्तानही महागाईचा सामना करत आहे.
आज पाकिस्तानमध्ये एका दिवसात पेट्रोलचे दर प्रति लीटर 30 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘घटनेच्या तीन तासांनंतर…’; अखेर सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं कारण आलं समोर
“राष्ट्रवादी हा शेजारच्या घरी पाळणा हलला की पेढे वाटणारा पक्ष”
“पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार”
मोठी बातमी | भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर
मोठी बातमी ! प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसे वाला यांची हत्या