तालिबान्यांना पाकड्यांची खुली धमकी, म्हणाले-“फेल झालात तर…”

काबूल | जगातील एक महत्त्वाची घटना म्हणून अफगाणिस्तानमधील तालिबानच्या राजवटीकडं पाहिलं जातं. दहशतवादी गटानं एका देशावर सत्ता मिळवल्यानं ही घटना महत्त्वपूर्ण मानली जाते.

तालिबानी दहशतवाद्यांनी तब्बल 20 वर्ष संघर्ष करून अफगाणिस्तानची सत्ता मिळवली आहे. त्यानंतर मुळात दहशतवादी असणाऱ्या तालिबाननं अफगाणिस्तानात दहशतवाद वाढणार नसल्याचं आश्वासन जगाला दिलं आहे.

अफगाणमधील तालिबानी राजवटीच्या समर्थनार्थ आणि विरोधात जगातील अनेक देश उतरले होते. त्यानंतर याचं दुरगामी परिणामी विविध देशांवर व्हायला सुरूवात झाली आहे.

अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवण्यात तालिबानला पाकिस्ताननं मदत केल्याची टीका पाकिस्तानवर होत होती. परिणामी आता पाकिस्ताननं तालिबानला आपल्या देशातील दहशतवादी कारवाया थोपवण्याचं आवाहन केलं आहे.

पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटना कारवाया करत असतात. या दहशतवादी संघटनांनाच्या कारवाईचा सर्वाधिक फटका हा भारताला वारंवार बसला आहे.

अशात आता पाकिस्तानातील तहरीक-ए-तालिबान या कट्टरपंथी दहशतवादी संघटनेच्या कारवाईला पाकिस्तान कंटाळला आहे. त्यांनी या संघटनेवर कारवाई करण्यासाठी पाकिस्ताननं तालिबानला आवाहनं केलं आहे. अन्यथा जागतिक समुदाय तालिबानला दहशतवादाला समर्थन करणारा समजतील, असं म्हटलं आहे.

तालिबाननं पाकिस्तानच्या या समस्येवर तोडगा काढला तर जगातील इतर देश समजतील की तालिबानला दहशतवादाशी लढायचं आहे, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.

तहरिकवर कारवाई करण्यात जर पाकिस्तान आणि तालिबान दोन्ही अपयशी ठरले. तर मात्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाकिस्ताननं पाकिस्तानमधील दहशतवादी कृत्य करणाऱ्या तहरिकवर कारवाईसाठी तालिबानची मदत मागितली आहे. हा पाकिस्तानचा मोठा पराभव असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘अशी वेळ कधीच आली नव्हती, मी यापूर्वी अनेकदा…’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख 

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर