“नरेंद्र मोदींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

नवी दिल्ली | भारतातील लोकांनी नरेंद्र मोदींना हरवलं पाहिजे. काश्मीर, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ढासळती अर्थव्यवस्था यावर देश-विदेशातून सुरु असणाऱ्या प्रतिक्रियेंमुळे नरेंद्र मोदींचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दिल्ली विधानसभेत हरण्याची भीती असल्याने त्यांच्याकडून दबावाखाली अनेक अजब दावे करण्यात येत आहेत. मोदी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत असल्याचंही फवाद हुसैन यांनी म्हटलं आहे.

भारताचं सैन्य पाकिस्तानला 7 ते 10 दिवसात हरवू शकतं. एनसीसीच्या कार्यक्रमात मोदींनी हे भाष्य केलं होतं. शेजारील देश तीनदा युद्धात पराभूत झालेला आहे. लोक छुपं युद्ध लढत आहेत. त्या शेजारील देशाचा पराभव करण्यासाठी 10 दिवससुद्धा लागणार नाहीत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ‘आप’ला पराभूत करण्यासाठी दिल्लीत भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार!

-तुम्ही अ‌ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का? संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणतात…

-“महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार”

-अभिमानास्पद…. जगप्रसिद्ध ‘आयबीएम’च्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी अरविंद कृष्णा!

-उद्धवसाहेब, भाजपने सुरू केलेल्या योजना बंद करू नका; रावसाहेब दानवेंचं सरकारला आवाहन