कर्जबाजारी पाकिस्तान चहा-बिस्कीटाला महाग!

इस्लामाबाद : भारत-पाकिस्तानचे व्यापारी संबंध तुटल्यापासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सध्या पाकिस्तानला त्यांच्या चहा बिस्कीटावर पैसे खर्च करणंही परवडत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सध्या काॅस्ट कटींग सुरू केली आहे. विकासयोजना सोडल्या तर कोणत्याही नव्या रोजगाराची निर्मिती केली जाणार नाही, असा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.  दिवाळखोरीत जाण्यापूर्वी पाकिस्तान सरकारनं नोकरभरती थांबवली आहे.  

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 6 अब्ज डाॅलर देण्याची माहिती मिळाली आहे. यासाठी त्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. यानुसार पाकिस्तान सरकारला आर्थिक नुकसान कमी करावं लागेल. याशिवाय इतरही काही अटी घालण्यात आल्या आहेत. सरकारने नुकसान कमी करण्यासाठी कॉस्ट कटिंग सुरू केलं आहे.

इमरान खान यांच्या सरकारने अधिकृत बैठीकीमध्ये दिल्या जाणाऱ्या चहापानातही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बैठकीत देण्यात येणाऱ्या चहा-बिस्किटावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत मधुमेहासारख्या आजारांशी झुंज देणाऱ्या अधिकाऱ्यांना अनेक तास चालणाऱ्या बैठकीत काहीही न खाता-पिता बसणं कठीण जाणार आहे, अशी माहिती पाकिस्तानमधील एका वृत्तपत्रातून समोर आली आहे.

चालू आर्थिक वर्षात कोणतीही नवी गाडी किंवा लष्करी सामना खरेदी करणं बंद केलं असून अनेक प्रकारे कॉस्ट कटिंग करण्यास पाकिस्तानने सुरुवात केली आहे. इतकंच काय पाकसरकारनं अधिकाऱ्यांना एकापेक्षा जास्त वृत्तपत्रे किंवा मॅगझीन खरेदीवरही मर्यादा आणल्या आहेत. तसेच सरकारी कार्यालयात कागदाची बचत करण्यासाठी कागदाच्या दोन्ही बाजू वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानवर 2018-19 मध्ये कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यांच्या कर्जात 2.29 अब्ज डाॅलरने वाढ झाली आहे. पाकिस्तानला समाधानाची बाब हिच की हे कर्ज मागच्या तीन वर्षात सर्वात कमी आहे.

महत्वाच्या बातम्या-