शिवसेनेला किती जागा देणार भाजपचं ठरलंय!; शिवसेना नमतं घेणार का???

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आपल्या गोटात खेचत भाजप-शिवसेनेनं विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे युतीतच तणाव निर्माण होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आगाी निवडणुकीत जागावाटपावरून भाजप-शिवसेनेत खडाजंगी होणार असल्याचीही चर्चा आहे. अशातच आता जागावाटपाबाबत भाजपचा एक नवा प्रस्ताव समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेला 120 ते 125 जागांचा प्रस्ताव देण्यात येण्याची शक्यता आहे. तसंच मित्रपक्षांसह भाजप 163 ते 168 जागांवर निवडणूक लढू शकते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिलं आहे. निवडणुकीसाठी भाजप याच प्रस्तावासाठी आग्रही राहिल्यास शिवसेनेची चांगलीच अडचण होऊ शकते.

मागील निवडणुकीत शिवसेनेनं जिंकलेल्या 63 जागा आणि त्यात अजून तितक्याच जागांची भर टाकत शिवसेनेला 125 पर्यंतच्या जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला शिवसेना कसा प्रतिसाद देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने विरोधकांचा धुव्वा उडवला. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी निवडणुकीसाठीचा भाजपचा सर्व्हे समोर आला होता.

महत्वाच्या बातम्या-

कर्जबाजारी पाकिस्तान चहा-बिस्कीटाला महाग! – https://t.co/CuunayaKZV @ImranKhanPTI

— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 26, 2019


 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहरीनचा पुरस्कार! – https://t.co/pOy8mFxkCh @narendramodi

— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 26, 2019