पालघर प्रकरणी सोशल मीडियावरुन आग लावणाऱ्यांना शोधून काढणार- उद्धव ठाकरे

मुंबई | पालघर हत्या प्रकरणानंतर आता सोशल मीडियावरुन आग लावण्याचं काम सुरु आहे. या आग लावणाऱ्यांचा शोध घेणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी फेसबुकवरुन जनतेशी संवाद साधला.

मॉब लिंचिंगचा प्रकार अत्यंत वाईट आहे. हे असं घडता कामा नये. महाराष्ट्रात असा प्रकार अजिबात सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

जे गुन्हेगार असतील, त्यांनी हत्या केली आहे. पोलिसांवर हल्ला केला आहे एकही आरोपी सुटणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय.

सोशल मीडियावरुन आग लावणाऱ्यांचा शोध घ्या असं मी अमित शाह यांना सांगितलं आहे. तुम्ही शोध घ्या, आम्ही सुद्धा घेतो कारण प्रत्यक्षात घडलेलं असतं वेगळ. आगी लावणारे आगी लावून जातात. त्यांच्यापर्यंत झळा पोहोचतच नाहीत. त्यामुळे त्यांना शोधणं गरजेचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“मुख्यमंत्री पदावर कोण आहे हे बघण्यापेक्षा, त्या पदाचा मान राखला पाहिजे”

-आपण काय करतो याचं भान भाजप नेत्यांनी सोडू नये; गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

-“मुख्यमंत्र्यांना सल्ले देऊ नका, त्यांना त्यांचे काम करू द्या”

-कोरोना लागण होतोना कोणताही वंश, धर्म, रंग, जात, पंथ, पाहत नाही – नरेंद्र मोदी

-‘संतांची, वीरांची भूमी नाही तर …’; पालघर प्रकरणावर सुमित राघवन संतापला