पंडितजींच्या जाण्याने भारताच्या सांस्कृतिक विश्वात पोकळी निर्माण झाली- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | ज्येष्ठ गायकृ पद्मविभूषण पंडित जसराज यांनी आज वयाच्या 90 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पंडित जसराज यांच्या जाण्याने सर्व संगीतकार आणि गायकांनी शोक व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे.

पंडितजींच्या जाण्याने भारताच्या सांस्कृतिक विश्वात पोकळी निर्माण झाली आहे आणि ही पोकळी कधीही न भरून येणारी नसल्याचं मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंडितजी इतर गायकांसाठी  ते कायम प्रेरणादायी आणि मार्गदर्शक म्हणून राहिले. त्यांच्या गायकीने त्यांनी अद्भुत ठसा उमटवला असल्याचं म्हणत मोदींनी पंडित जसराज यांच्या कुटुंबियांना धीर दिला आहे.

दरम्यान, पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवलं. जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला होता. जसराज चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांचे मोठेभाऊ पंडित मणिराम यांनी त्यांचं संगोपन केलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

पद्मविभूषण प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचं निधन

रोहित पवार यांनी ‘या’ कारणावरून मानले नरेंद्र मोदींचे आभार

‘पवार कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे, सर्व काही सुरळीत होईल’; ‘या’ बड्या नेत्याचा विश्वास

“आदित्य ठाकरे यांची निवड योग्यच, ते एक जिद्दी आणि सक्षम नेता आहेत”

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची वर्णी