मी उद्धवजींवर टीका नाही करणार, वाटलं तर सूचना करेन – पंकजा मुंडे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर आणि कोरोनाची परिस्थिती ते ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्यावर महाराष्ट्र भाजप सातत्याने टीकास्त्र सोडत आहे. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते. उद्धवजी कोरोनाची कठीण परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळत असल्याचं मला दिसत आहे, असं त्या म्हणाल्या. तर मी त्यांच्यावर टीका करणार नाही वाटलं तर सूचना करेल, अशी सामंजस्याची भूमिका त्यांनी घेतली.

मुख्यमंत्र्यांविषयी लोकांच्या मनात वेगळं व्यक्तिमत्व असतं. म्हणजे ती व्यक्ती अमूक-तमुक असावी. त्याने ठराविक कपडे परिधान करावेत. विशिष्ट पद्धतीचं व्यक्तिमत्व असावं. पण, या सगळ्यांपेक्षा ते वेगळे दिसत आहेत, असं म्हणत त्यांनी उद्धव यांच्या व्यक्तीमत्वाचं कौतुक केलं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे सोशल मीडियावर फार अ‌ॅक्टीव्ह होते. मात्र आता उद्धव ठाकरे फारसे सोशल मीडियावर अ‌ॅक्टीव्ह नाहीयेत. त्यांचे बरेचसे ट्वीट सीएमओ करतं. उद्धवजींचा कल मला वेगळा वाटतो. ते काहीतरी नवीन पायंडा पाडतील, असं त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

-‘उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील’; पंकजा मुंडेंकडून ठाकरे सरकारच्या कामाचं कौतुक

-अजय देवगणच्या ट्विटला मुंबई पोलिसांचं खास अंदाजात उत्तर; म्हणाले…

-गायिका कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटीव्ह; डिस्चार्जनंतर होम क्वारंटाईन

-चौकशी म्हणजे निव्वळ डोळ्यात धुळफेक; अधिकाऱ्याला निलंबित करा- प्रसिद्ध IAS खेमका

-डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्तचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी उचललं कडक पाऊल