दुसऱ्याचं रिजार्ज करा आणि मिळवा नफा; जिओ, एअरटेलची अनोखी ऑफर

मुंबई  | देशातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलनं लोकांना अतिरिक्त कमिशन मिळवण्याची एक संधी दिली आहे. जे दुसऱ्यांचं रिचार्ज करतील त्यांना त्यांना त्वरित कॅशबॅक देण्यात येणार आहे. प्रत्येक यशस्वी रिचार्जवर ही ऑफर लागू असणार आहे.

एअरटेल थँक्स अॅपवर सुपर हिरो फिचरची सुरूवात केल्याची माहिती एअरटेलनं गुरूवारी दिली. याद्वारे ग्राहक सुपर हिरो म्हणून आपलं नाव नोंदवू शकतात. नोंदणी नंतर ग्राहकांना कोणत्याही अन्य एअरटेल क्रमांकाचं रिचार्ज करून देता येईल आणि प्रत्येक रिचार्जमागे कंपनीकडून कॅशबॅकही मिळणार आहे.

एअरटेलनं नुकताच यासंदर्भातील एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यात एअरटेल थँक्स अॅपवर देण्यात आलेल्या सुपरहिरो फिचरबाबत माहिती देण्यात आली आहे. तसंच या स्कीमबद्दलही मार्गदर्शन करण्यात आलं आहे. जर एखाद्या ग्राहकानं दुसऱ्याचा मोबाइल क्रमांक रिचार्च केला तर कापली जाणारी रक्कम ही एमआरपीपेक्षा चार टक्के कमी असेल, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

एअरटेलप्रमाणेच जिओनंही JioPOS लाइट हे अॅप सुरू केलं आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती जिओ पार्टनर बनू शकते. या अॅपवर सर्वप्रथम साईन इन करावं लागतं. त्यानंतर वॉलेटमध्ये टाकलेल्या पैशांद्वारे जिओ युझर्सचा मोबाईल रिचार्ज करू शकता.

महत्वाच्या बातम्या 

-मी उद्धवजींवर टीका नाही करणार, वाटलं तर सूचना करेन – पंकजा मुंडे

-‘उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील’; पंकजा मुंडेंकडून ठाकरे सरकारच्या कामाचं कौतुक

-अजय देवगणच्या ट्विटला मुंबई पोलिसांचं खास अंदाजात उत्तर; म्हणाले…

-गायिका कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटीव्ह; डिस्चार्जनंतर होम क्वारंटाईन

-चौकशी म्हणजे निव्वळ डोळ्यात धुळफेक; अधिकाऱ्याला निलंबित करा- प्रसिद्ध IAS खेमका