‘पदामुळे काही होत नाही…’; पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | मला आता कशाचीही अपेक्षा नाही. मी लोकांमध्ये आहे. मी राज्यभर फिरत आहे. कुठल्या पदाने काही होणार नाही असंही माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

संपूर्ण दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. पण या सरकारला अहंकार आहे. त्यांना कर्मचाऱ्यांचं उपोषण, त्यांची आंदोलनं दिसून येत नाहीत, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सो़डलंय.

आम्ही अनेक ठिकाणच्या आंदोलनाला भेट दिली. सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा चर्चेचा सूरच नकारात्मक आहे. चर्चेतून हा मुद्दा सोडवता येऊ शकतो, पण सरकार या सकारात्मक विचार करत नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने सरकार चालवण्याऐवजी दुकानदारी चालवायचं ठरवलंय, असं चित्र असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली.

भाजपने हाती घेतलेली मराठवाड्यातील वॉटरग्रिड योजना सरकारने बंद पाडली. जलयुक्त शिवार बंद केली. त्यामुळे सरकारचं मंत्रालय बंद आणि दुकानदारी सुरु आहे असं वाटतंय, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

राज्यातील मुख्यमंत्री पदानंतर असलेल्या महत्त्वाच्या पदांवरील मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात बरबटलेले आहेत. गृहमंत्र्यांनीच एवढा भ्रष्टाचार केला असेल तर जनतेनेही या सरकारकडून कोणत्या तोंडाने अपेक्षा करावी, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

ओबीसीच्या आरक्षणावरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. तुम्हाला इम्पिरिकल डेटाची व्याख्या तरी माहीत आहे काय?, असा सवाल त्यांनी केलाय.

ओबसी आणि बहुजनांना अंधारात लोटणारा निर्णय सरकारच्या काळात झाला. ओबीसीचं आरक्षण रद्द झालं. ओबीसीचं आरक्षण स्थगिती होण्यापासून रद्द होईपर्यंत जो कालावधी मिळाला यावेळी तात्काळ पावलं उचलली असती तर आरक्षण वाचलं असतं. इम्पेरिकल डेटा दिला नाही. आयोग स्थापन केला, पण निधी दिला नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

आरक्षण संपुष्टात आणायचं की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनानंतर ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून आरक्षणाला संरक्षण देण्याचं ढोंग घेतलं आहे. या अध्यादेशाविरोधात लोक औरंगाबाद खंडपीठात गेले आहेत, असं त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

“मला माफ करा, पवारसाहेब तुमच्यासाठी जीव देईन पण…” 

“एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं” 

“…अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जा” 

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती! 

पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ ठिकाणी पाऊस, हवामान खात्याचा इशारा