…म्हणून माझा पराभव झाला, माझा गाफीलपणा मला नडला- शशिकांत शिंदे

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यापंचवार्षिक निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत. जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला.

ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. शिंदे यांना 24 तर रांजणे यांना 25 मते मिळाली. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत.

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे.

शिंदे समर्थकांना पक्ष कार्यालयावर दगडफेक करत राग व्यक्त केला असून त्यामुळे परिसरातील वातावरण तापलेलं आहे. या दगडफेक प्रकरणी शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे.

मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, असं शशिकांत शिंदे म्हणालेत.

माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो, माझ्यासाठी पवारसाहेब, अजितदादा यांनी प्रयत्न केले, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.

शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत शशिकांत शिंदेंनी घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागितली.

मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार यांना माहिती आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘पदामुळे काही होत नाही…’; पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य 

“मला माफ करा, पवारसाहेब तुमच्यासाठी जीव देईन पण…” 

“एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं” 

“…अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जा” 

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!