विरोधकांना गाडण्यात माझी पी. एचडी…. म्हणूनच दिल्लीच्या प्रचाराला आले- पंकजा मुंडे

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. महाराष्ट्र भाजपचे अनेक नेते दिल्लीत प्रचाराला आले आहेत. पंकजा मुंडे यासुद्धा दिल्लीत प्रचाराल आल्या आहेत.  विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे, म्हणूनच दिल्लीच्या प्रचाराला आले आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

मला दिल्लीत जास्त कुणी ओळखत नाही. मी दिल्लीत लोकप्रिय नाही. पण लोक मला माझ्या वडिलांच्या नावाने ओळखतात. विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे. म्हणूनच अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांनी आम्हाला दिल्लीच्या प्रचाराला बोलावलं आहे, असं त्या म्हणाल्या.

दिल्लीतलं झाडूवालं सरकार यावेळी दिल्लीतून हटवा. दिल्ली या देशाचं मुकुट आहे. ते मुकुट नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर ठेवा, असं आवाहन पंकजा यांनी यावेळी दिल्लीकरांना केलं.

दरम्यान, महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे या दिल्लीत प्रचाराला दाखल झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विनोद तावडेंवर दोनच दिवसांपूर्वी बोचरी टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘सुपर ओव्हर’ला त्रासून न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांची अजब मागणी! म्हणाले…..

-हिटलरने जर्मनीत केलं तोच प्रकार भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा मोदी-शहांवर आरोप

-अरविंद केजरीवालांनी घातलीये भाजप समर्थकांच्या काळजाला साद; व्हीडिओ नक्की बघा…

-छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- फडणवीस