मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर पंकजा मुंडेचं लाक्षणिक उपोषण

औरंगाबाद | मराठवाड्यातील पाण्याची वणवण संपावी या प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आज उपोषण करणार आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण आक्षेपांसाठी नसून अपेक्षांसाठी केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या उपोषणात सहभागी होणार असल्याचं कळतंय. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने हे आंदोलन होणार होतं. पणं आता ते भाजपचं आंदोलन असणार आहे.

मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न संपून समृद्धीची सत्ता स्थापन व्हावी यासाठी माझं उपोषण एक लक्षवेधी प्रयत्न असणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या उपोषणात मराठवाड्यातील सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी भाजप नेत्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-…अन् शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात

-नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं तर ही वेळ आली नसती- गुलाबराव पाटील

-देश आधी मनसे, अन् आता काँग्रेस करतंय अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ला विरोध

-“शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रात हे दोनच विठ्ठल”

-“‘त्या’ आरटीआय कार्यकर्त्यांचे हातपाय तोडा”