…अन् शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात

अहमदनगर | एरव्ही प्रचार सभेतून एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या नेते जर एकाच मंचावर किंवा एका कार्यक्रमात पाहिले तरीही चर्चा होतेच. संगमनेरच्या ओझरमध्ये प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वाढदिवसादिवशी एका मंचावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकत्रच पाहायला मिळाले आहेत.

इंदुरीकर महाराजांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ओझर गावात पार पाडला. यावेळी निवृत्ती महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत एका रथात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकत्रच बसले होते.

निवृत्ती महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील आणि सत्यजित तांबे यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, इंदुरीकरांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर रोहित पवार यांनी फेसबुकवर या कार्यक्रमाची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या-

-नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं तर ही वेळ आली नसती- गुलाबराव पाटील

-देश आधी मनसे, अन् आता काँग्रेस करतंय अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ला विरोध

-“शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रात हे दोनच विठ्ठल”

-“‘त्या’ आरटीआय कार्यकर्त्यांचे हातपाय तोडा”

-नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही; शिवसेनेची बोचरी टीका