“पंकजाताईंना सुद्धा संधी मिळेल, वर्षभरात खुप स्कोप”

मुंबई |   राज्यात  होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. राज्यात पाच विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे.  यावेळेस पक्षाच्या निष्ठावान असलेल्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात येत आहे, अशा प्रतिक्रीया येत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे.

भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बाहेर असलेले विनोद तावडे यांना नव्याने संधी मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली आहे. पंकजाताईंना सुद्धा संधी मिळेल, वर्षभरात खुप स्कोप आहे, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

विनोद तावडे यांना संधी देण्यात आली याचा मला मनापासून आनंद आहे. संयम आणि निष्ठा ठेवली की, पुन्हा संधी मिळतेचं, असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवर बोलताना केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याचा माध्यमे अर्थ लावतात तसं काही नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. इतरांनाही संधी मिळेल पंकजाताईंनाही संधी मिळेल,असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

तसेच विनोद तावडे यांनीही पंकजांच्या उमेदवारीवर वक्तव्य केलं आहे. मला ज्यावेळेस तिकिट नाकारलं गेलं त्यावेळेस मी म्हटलं होतं की, मला महत्त्वाची पद दिली.

चांगलं खातही मिळालं होतं. जी जबाबदारी पक्ष देईल ती घेतली.मला जेव्हा तिकिट नाकारलं गेलं तेव्हा माझ्या जागी ज्याला उमेदवारी मिळाली त्याचा फॉर्म मी भरायला गेलो होतो, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.

तसेच तेव्हापासून ते आज राष्ट्रीय सरचिटणीस हा प्रवास बराच बोलका आहे. पंकजाताईंकडेही महत्त्वाचं पद आहे. भाजपमध्ये संयम बाळगल्यास संधी कशी मिळते यासाठी माझं उदाहरण  बोलकं आहे, असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

रविवारी बुलडाणा जिल्ह्यात पंकजा मुंडे यांनी ‘ माझं विश्व माझे माता पिता, माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला दहा परिक्रमा करेल अजुन कुठल्या परिक्रमाची मला आवश्कता नाही. एखाद्या गरिब फाटक्या माणसाला त्याच्या पायावर डोकं आपटून नतमस्तक होईल’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

तसेच कुठल्या पदासाठी हात फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही, असंही पंकजा म्हणाल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे अप्रत्यक्षरित्या नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. प्रितम यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अनेक मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

“या सरकारचा किमान-समान कार्यक्रम म्हणजे वसूलीचा कार्यक्रम”

गहलोतच राजस्थानचे पायलट! राजस्थान काॅंंग्रेसचा कलह संपला

 “उगाच माथी भडकाऊ नयेत, फडणवीसांनी थोडा संयम बाळगायला हवा”

 विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी! प्रमोद महाजन यांची जागा घेणारे दुसरे नेते ठरले तावडे

 “कंगणाचं संरक्षण आणि पुरस्कार पाहून गोखलेंनाही पद्मश्री व्हायचंय दिसतंय”