“अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळेंच्या डोळ्यातले अश्रू बघून वाईट वाटलं”

मुंबई | अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे यांचा चेहरा मी बघितला. त्यांच्या डोळ्यातील अश्रूही मी पाहिले. मला ते बघून हसू आले नाही. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. मला वाईट वाटलं. आपला 80 वर्षांचा बाप लढा दिल्यानंतर त्यांच्या पक्षात फूट पडते का? आपल घर फुटतयं की काय? ही वेदना एका मुलीच्या चेहऱ्यावरची मी भोगलेली आहे, असं भजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. पराभव वगैरे चिल्लर गोष्टींनी पंकजा मुंडे खचणारी नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

माझ्याकडे सत्ता नव्हती, अधिकारी नव्हते… फाटक्या लोकांनी माझी संघर्ष यात्रा काढली. छोट्याशा पराभवाने खचणारी पंकजा मुंडे नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. पिता गमावण्यासारखं दुसरं मोठं दु:ख नाही, असं पंकजा यांनी म्हटलं

माझ्या बापाचा पक्ष आहे म्हटलं तर काय चूक आहे… मुठभर लोकांचा पक्ष मुंडे साहेबांनी गावोगावी पोहचवला. मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर निर्णय घ्यावा, असं म्हणत आपण पक्ष सोहणार नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-