“महाराष्ट्रात महिला बालविकास मंत्रिपदी पुरुषाला संधी दिल्याबद्दल अभिनंदन”

मुंबई | दोन आठवड्यानंतर गुरुवारी महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर झालं. महत्त्वाचे गृह आणि नगरविकास खाते शिवसेनेनं आपल्याकडे ठेवले आहेत. मात्र, या खातेवाटपावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात महिला बालविकास मंत्रिपदी पुरुषाला संधी दिल्याबद्दल जाहीर अभिनंदन. हे तुम्हीच करू शकता आणि छाती ठोक सांगू शकता आम्ही करून दाखवलं, असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

खातेवाटपात महिला बालविकास मंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. यावरुन राणेंनी हा निशाणा साधला आहे. काँग्रेसकडे महसूल, उर्जा, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्त्वाची खाती आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ, ग्रामविकास आणि सहकार अशी खाती आली आहेत.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडे 11 खात्यांची जबाबदारी आहे. यामध्ये उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण यांसारखी महत्त्वाची अन्य खाती आहेत तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. तसंच नगरविकास आणि वनं खातं देखील त्यांच्याकडे देण्यात आलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-