“आई प्रचारसभेत सांगायची, मुंडेसाहेबांचं चिन्ह कमळ अन् ही आमची पंकजा”

मुंबई | बीडमध्ये वरद ग्रुपच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे नगर उभारण्यात आले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते या नगराचं लोकार्पण करण्यात आलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचं राज्यातलं पहिलेच नगर उभारण्यात आलं आहे. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पंकजा मुंडे यांनी भाजप आणि कमळ यांच्यातील नातं किती जवळचं आहे, त्याचं एक उदाहरण दिलं आहे. मी नऊ महिन्यांची होते, तेव्हापासून मुंडेसाहेब प्रचारावेळी मला सोबत घेऊन जायचे, अशी आठवण पंकजांनी सांगितली आहे.

त्यावेळी माझी आई मला कडेवर घेऊन जायची. त्यावेळी प्रचारसभा मी ऐकल्या होत्या. त्यावेळी आई जमलेल्या लोकांना माझ्याबद्दल सांगायची, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

जमलेल्या लोकांना आई सांगायची की, मुंडेसाहेब यांचं चिन्ह कमळ आहे आणि ही आमची मुलगी पंकजा. तेव्हापासून मी भाजपचा प्रचार करायचे, असा किस्सा पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

भाजप पक्ष मोठा करण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा हात होता. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची जादू अद्याप कायम असल्याचं दिसतं. त्यामुळे आजच्या सभेत मोठी गर्दी देखील पहायला मिळाली होती.

दरम्यान, राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर पंकजा मुंडे काही काळ अलिप्त राहिल्या होत्या. त्यानंतर आता त्या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचं पहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत रडली शेहनाज, सलमान खानलाही अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

 सेक्स स्कॅंडलमुळे चर्चेत राहिलेत ‘हे’ पाच दिग्गज क्रिकेटर, तेव्हा क्रिकेटही शर्मेनं झुकलं होतं

12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार

“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार