माझे भाऊ ‘दोन’ नंबरवाले आहेत- पंकजा मुंडे

बीड : विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे. तसे नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. असंच परळी मतदारसंघात मतदानयंत्रावर माझे भाऊ धनजय मुंडेंचा दुसरा नंबर लागतो, कारण ते दोन नंबरवाले आहेत, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी धनजय मुंडेंवर घणाघाती टीका केली आहे.

जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारादरम्यान रायमोहा येथे सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषण करताना पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

माझा तिसरा नंबर आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मी तिसऱ्यांदा निवडून येणार आहे, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

परळी मदरारसंघातून भाजपकडून उभ्या असलेल्या पंकजा मुंडेंनी मी तिसऱ्यांदा निवडून येऊन विजयाची हॅट्ट्रिक करणार आहे. तुमची कितवी वेळ आहे? असा प्रश्न जयदत्त क्षीरसागर यांना पंकजांनी केला. कार्यकर्त्यांमधूम डबल हॅट्ट्रिक उत्तर येताच, म्हणजे तुमच्या पहिल्या निवडणुकीवेळी मी नव्हतेच की काय! असं म्हणत पंकजा मुंडेंनी हशा पिकवला.

दरम्यान, भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी याच सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला होता.

महत्वाच्या बातम्या-