बुलढाणा | अनेकदा नोटीस पाठवल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख 1 नोव्हेंबरला ईडी कार्यालयासमोर हजर झाले होते. त्यानंतर 13 तासाच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
अनिल देशमुखांच्या अटकेनंतर परमबीर सिंह यांनी पुरावे नसल्याचं चौकशी आयोगासमोर सांगितलं होतं. त्यामुळे अनिल देशमुखांना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा आदेश फिरवला. आता अनिल देशमुखांना ईडीची कोठडी सुनावली करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणात अनिल देशमुखांवर आरोप केलेले परमबीर सिंह नक्की कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. परमबीर सिंह बेल्झियममध्ये असल्याचं काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी म्हटलं होतं.
आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. बुलढाण्यात पत्रकारांशी बोलताना राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी हे आरोप केले आहेत.
100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मात्र, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अजूनही बेपत्ता आहेत, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
परमबीर सिंह यांचं शेवटचं लोकेशन गुजरातमधील अहमदाबादमधील होतं. त्यावेळी तिथूनच त्यांना भाजपने गायब केलं, असा धक्कादायक आरोप नाना पटोले यांनी केलं आहे.
परमबीर सिंह गायब झाल्यानंतर ते कुठेच दिसले नाहीत. ते अहमदाबादमधून गायब झाले. त्यांना गायब करण्याचं काम केंद्रातील भाजप सरकारने केला आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणातून महाविकास आघाडीला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बिहार निवडणुकीच्या तोंडावर सुशांत सिंह प्रकरण उकरून काढण्यात आलं होतं, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
आर्यन खान प्रकरणावरून भाजपने हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजपने केलं आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला 24 तासांपैकी 2 तास उचक्या लागतात, माझं एवढं नाव घेतलं जातं”
…म्हणून अनिल देशमुखांची ईडीच्या कोठडीत रवानगी; आलं ‘हे’ कारण समोर
“…आता सामाजिक मंत्र्याचं सामाजिक भान हरवलंय”
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी एम्सच्या डाॅक्टरांचा मोठा खुलासा, म्हणाले…
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आणखी एक झटका