Top news देश

भडकावू बातम्या पसरवणाऱ्या वाहिन्यांविरोधात पार्लेजी कंपनीनं घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये माणुसकीला हेलावून टाकणारी घटना घडली. या घटनेनंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी चुकीच्या बातम्या दाखवल्या होत्या.

यानंतर वाहिन्यांचा टीआरपीचा घो.टाळा समोर आला. आता भारतात सर्वात जास्त पसंद केले जाणारे पार्लेजी बिस्कीट कंपनीनं एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नुकतेच टीआरपीचा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

जी वृत्तवाहिनी चुकीच्या बातम्या आणि जनतेमध्ये भांडण लावून देणारा मजकूर दाखवतात. त्या वाहिनीला आणि टीआरपी घोटाळ्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही वृत्तवाहिनीला पार्लेजी कंपनी जाहिरात देणार नाही, अशी घोषणा पार्लेजी कंपनीने केली आहे.

पार्लेजीचे वरिष्ठ प्रमुख कृष्णाराव बुद्धा यांनी सांगितले की, आमची कंपनी अशा कोणत्याही वाहिनीला पैसे देणार नाही, ज्यांचे नाव टीआरपी घोटाळ्यामध्ये आहे आणि जे चुकीच्या बातम्या दाखवत आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कंपनी काही जाहिरातदारांसोबत संपर्क करत आहे. यामुळे त्या वाहिनीच्या जाहिरातींच्या पैशांवर रोख लावता येईल. पार्लेजी कंपनीबरोबरच बजाज ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल बजाज यांनीही असाच निर्णय घेतला आहे.

बजाज ऑटो कंपनीही चुकीच्या बातम्या दाखवणाऱ्या वृत्तवाहिन्यांचे पैसे रोखणार आहे. त्याचबरोबर बजाज ऑटो कंपनीने सांगितले की, तीन वृत्तवाहिन्या त्यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मीडिया इंडस्ट्रीमध्ये टीआरपी घोटाळ्यासंबंधित अनेक गोष्टी समोर आल्या. ज्यामध्ये काही वृत्तवाहिन्यांनी त्यांचे रेटिंग वाढण्यासाठी चुकीचा टीआरपी दाखवला.  टीआरपीसाठी काही घरांमध्ये कायम एकच वृत्तवाहिनी दाखवली जात होती.

मुंबई पोलिसांनी अशा वाहिन्यांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलीसांनंतर पार्लेजी आणि बजाज कंपनी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ट्विटरवर अनेक लोक त्यांचे कौतुक करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी! रियाला पाठींबा देत म्हणाला…

मित्रांच्या मदतीने त्याला मिळाले नवीन आयुष्याचे गिफ्ट; सोनू सूदही मदतीसाठी धावला

सुशांत प्रकरणी आता अमित शहांनी देखील सोडलं मौन; महाराष्ट्र सरकारवर आरोप करत म्हणाले..

‘केबीसी’तील अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ प्रसिध्द डायलॉग कोणी लिहिला आहे? वाचा सविस्तर

कौतुकास्पद! या जोडप्यानं लग्न खर्च वाचवून तब्बल 500 श्वानांना केली ‘अशी’ मदत