‘पार्ट टाईम मुख्यमंत्री’; भाजपच्या या टीकेवर शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | सध्या नवाब मलिक यांच्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. त्यामुळे सरकार आणि विरोधी सरकार एकमेकांवर अनेक गंभीर आरोप करत आहे.

काल मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकारीणी बैठक झाली आहे. या बैठकीला अनेक भाजप नेत्यांनी उपस्थीती लावली. यावेळी अनेकांनी सरकारवर ताशेरे ओढले.

कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनीही ठाकरे सरकारला लक्ष केलं.

राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्यांची गरज नाही. फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्र्याची राज्याला गरज आहे, असं म्हणत सी. टी. रवी यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आता यावर आज शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप करत आहेत त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

भाजपच्या या वक्तव्यात काही दम नाही, मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो. त्यांना जबाबदारी दिली आहे, जनतेने स्वागत केलं आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

पुढे शरद पवार म्हणााले की, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ऑपरेशनचे संकट असूनही त्यांचं काम सुरू आहे. हे कौतुकास्पद आहे.

दरम्यान, नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना शरद पवार यांना नवाब मलिकांची पाठराखण करत त्यांना पाठिंबा दर्शवला. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचंही कौतुक केलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  शरद पवारांचा नवाब मलिक यांना पाठिंबा, म्हणाले…

  कंगनानं गांधीजींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  मराठमोळ्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल; पत्नीनं केले मारहाण आणि हिंसाचाराचे आरोप

  थंडीतही पुढील 2-3 दिवस कोसळणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

  ‘सत्तेची भूक असणाऱ्यांनी….’; कंगनाचा पुन्हा एकदा गांधीजींवर निशाणा