इंधन दरवाढीचा परिणाम आता रिक्षावरही; केली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

पुणे | देशभरात गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीनं डोकं वर काढलं आहे. या काळात सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोरोना महामारीच्या काळात अनेक गोष्टी महागल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये चितेंचे वातावरण पहायला मिळालं.

कोरोना महामारीत महागाईचं प्रमाण वाढलं असताताना इंधन दरवाढीणंही उच्चांक गाठलेला पहायला मिळाला. देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अजूनही दरांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असातना आता रिक्षाचे दरही महागले असल्याचं समोर आलं आहे.

इंधन दरवाढीमुळे आता रिक्षाचे दरही महागले आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढ वाढत असतानाच आता पुणेकरांचा रिक्षाप्रवासही महागला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

रिक्षाच्या 18 रुपये भाडेदरात आता 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांचा रिक्षाप्रवास 18 रुपयांचा 21 रुपयांवर आला आहे. आता 22 नोव्हेंबरपासून या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपुर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक परिवहन विभागाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत पुण्यातील रिक्षा भाडेवाढी संदर्भात प्राथमिक निर्णय घेण्यात आला होता.

आता पुण्यात दिड किलोमीटरला आकारले जाणारे 18 रुपये वाढले असून 22 तारखेपासून 3 रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे आता नवीन दरामुळे पुन्हा पुणेकरांचं टेंशन वाढवलं आहे.

दरम्यान, आता इंधन दरवाढीमुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘पार्ट टाईम मुख्यमंत्री’; भाजपच्या या टीकेवर शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

  शरद पवारांचा नवाब मलिक यांना पाठिंबा, म्हणाले…

  कंगनानं गांधीजींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  मराठमोळ्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल; पत्नीनं केले मारहाण आणि हिंसाचाराचे आरोप

  थंडीतही पुढील 2-3 दिवस कोसळणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा