देशप्रेमी नागरिकांनी मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं; बाळा नांदगावकरांचं आवाहन

मुंबई |  बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून देण्यासाठी केंद्र शासनाने पावले उचलावीत, याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 9 तारखेला मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला सर्व देशप्रेमी नागरिकांनी यावं, असं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आमच्या मोर्च्यात जर कुणी यायचं म्हणत असेल तर त्यांना आम्ही थोडी सांगू शकतो की तुम्ही येऊ नका म्हणून. कारण आमचा मोर्चा हा देशप्रेमी लोकांचा आहे. सगळ्या देशप्रेमी लोकांचं आम्ही स्वागत करतो, असं नांदगावकर म्हणाले. भाजपबद्दल प्रश्न विचारला असता त्यांचे कार्यकर्ते जर आले तर त्यांचंही स्वागत, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांचा मोर्चा मुस्लिम बहुल भागांमधून जाणार आहे, अशी चर्चा आहे. तशी परवानगी देखील मनसेने मुंबई पोलिसांकडे मागितली आहे. तेव्हा मुंबई पोलिस कुठून-कुठपर्यंत मनसेच्या मोर्चाला परवानगी देतात, हे पाहणे महत्त्वाचं आहे.

दुसरीकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली आहे.  आशिष शेलार यांनी याअगोदर राज ठाकरेंची दोन वेळा भेट घेतली होती. मनसेचं अधिवेशन झाल्यानंतर त्यांनी राज यांची भेट घेतल्याने राज ठाकरेंच्या इंजिनाला भाजपचं इंधन आहे का?, अशी चर्चा आता सुरू झालीये.

NRC च्या माध्यमातून बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांची हकालपट्टी होत असेल तर माझा केंद्र शासनाला पाठिंबा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. भाजपचा देखील NRC हे प्रस्तावित विधेयक आहे. त्यामुळे भाजप आणि राज यांच्यात जवळिकता वाढलेली दिसीन येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

-राज ठाकरेंच्या इंजिनाला भाजपचं इंधन?? राज आणि आशिष शेलार यांची तासभर चर्चा

-मुनगंटीवारांना हे शहाणपण आधी का सुचलं नाही?- नवाब मलिक

-फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती

-ठाकरे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही; या नेत्याचा घणाघात