हटके अंदाजात पवनदीपने केलं अरुणिताला प्रपोज, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबईदेशातील गाण्याचं सर्वात मोठं स्टेज समजल्या जाणाऱ्या ‘इंडियन आयडॉल’च्या बाराव्या पर्वाचा काही दिवसांपूर्वीच अंत झाला आहे. हे पर्व नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस पडलं होतं. इंडियन आयडॉलचे हे पर्व संपले तरी देखील प्रेक्षकांच्या मनात अद्याप या शोची जादू आहे.

या पर्वातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांवर जणू जादूच केली होती. इंडियन आयडॉलच्या बाराव्या पर्वाचा विजेता पवनदीप राजन आणि अरुणीता कांजीलाल हे या पर्वातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार ठरले. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली.

तसेच या दोघांच्या नात्याबद्दल देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जातं होतं. मात्र, दोघांनीही या गोष्टीला नकार देत आपण फक्त चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं.

अशातच सध्या सोशल मीडियावर अरुणीता आणि पवनदीपचा शोदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही रोमँटीक अंदाजात दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही ‘तेरा होने लगा हूँ’ हे गाणं गात रोमँटीक डान्स करत आहेत.

व्हिडीओदरम्यान पवनदीप अरुणिताला प्रपोज देखील करताना दिसत आहे. पवनदीप गुडघ्यावर बसतो आणि अरुणिताला लाल रंगाचे गुलाबाचे फूल देवून प्रपोज करतो. चाहत्यांंना अरुणिता आणि पवनदीपचा हा व्हिडीओ खूप आवडत आहे.

अरुणिता आणि पवनदीपच्या या व्हिडीओवर कमेंट करत एका चाहत्याने बेस्ट कपल अशी कमेंट केली आहे. तर एका चाहत्याने दोघेही एकत्र खूप सुंदर वाटत असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“नौटंकी सिद्धार्थसाठी तरी तू नाटक करणं बंद कर!”

अंकिताच्या घरी देखील गौरीचं आगमन, पाहा खास व्हिडीओ

‘…मला अजूनही सुशांतचा आवाज ऐकू येतो’; सुशांतच्या आठवणीत त्याची एक्स गर्लफ्रेंड व्याकूळ

बोटमध्ये चप्पल घालून चढणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्रीला अटक

सिद्धार्थची ‘त्या’ रात्रीच्या अर्ध्या तासाची कॉल हिस्टरी समोर, विशालने केला खुलासा