“पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत”

मुंबई | पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाही. जे काही करतात ते 10-15 दिवसआधी चर्चा करुन मार्ग काढतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत निर्णय घेतात. भाजपसारखे ऑपरेशन लोटस करत नाहीत. ते त्यांनाच जमतं. एकापाठोपाठ राज्य जात आहेत. लोक ठरवतील कुणाचं ऑपरेशन कसं करायचं ते, मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

भारतीय रिपब्लिकन पार्टी-बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनतर दोन्ही नेत्यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी बैठक झाली. या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह 47 पदाधिकाऱ्यांनी वंचित आघाडीला सोडचिठ्ठी दिली. 26 फेब्रुवारीला त्यांनी आणि इतर 45 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे पाठवले असल्याचं कळतंय.

दरम्यान, राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यात आता वंचितचे समर्थक आणि दोन माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या –

विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं!

वंचितला मोठा धक्का; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आपला पॅटर्नच वेगळा; मुळशीत लग्न लागताच गाड्या फटाक्यासारख्या पेटल्या!

-YES बँकेच्या संस्थापकांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी