ठाकरे-एकबोटे यांच्या भेटीवर भुजबळ म्हणातात…

मुंबई | धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री यांनी छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे हे राजकारणी असल्याने त्यांना कोणालाही भेटण्याचा हक्क आहे. मात्र, आपण काय भूमिका घेत आहोत, हे कळण्याइतकी समज त्यांच्याकडे आहे. त्यांनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेणे स्वागतार्ह आहे. त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे, असं एकबोटे यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटेंनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, येत्या 24 तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत”

विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं!

वंचितला मोठा धक्का; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आपला पॅटर्नच वेगळा; मुळशीत लग्न लागताच गाड्या फटाक्यासारख्या पेटल्या!