उदयनराजेंविरोधात पवारांचा खास मोहरा मैदानात, स्वत: शरद पवार फॉर्म भरायला जाणार

सातारा :  सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी  भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधातील आघाडीचा उमेदवार ठरला आहे. गुरुवारी 3 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.अशी माहिती समजत आहे.

माजी खासदार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे साताऱ्यात आता राजे विरुद्ध माजी राज्यपाल अशी लढत पाहायला मिळणार आहे.

21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून विधानसभेसोबतच म्हणजेच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होणार आहे. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पोटनिवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा होती.

श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मोठे आव्हान उभे राहू शकतं. 

महत्वाच्या बातम्या-