‘या’ दोन रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वात कमी धोका!

नवी दिल्ली | गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या महामारीवर लस केव्हा येणार? या एका गोष्टीकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. कोरोनावर जगातील कित्येक शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.

कोरोना व्हायरसवर जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी महत्वाचं संशोधन केलं आहे. कोणत्या ब्लड ग्रुपला कोरोनाचा किती प्रमणात धोका आहे. यावर देखील आजवर बरंच संशोधन झालं आहे. अशातच आता कॅनडा मधील काही शास्त्रज्ञांनी ब्लड ग्रुपनुसार कोरोनाच्या धोका पातळीची माहिती दिली आहे.

कॅनडातील शास्त्रज्ञांच्या मते, ‘ओ निगेटिव्ह’ ब्लड ग्रुपवाल्यांना कोरोनाचा धोका कमी आहे. तसेच या ब्लड ग्रुपवाले लोक केव्हाही कोरोनामुळे गंभीर आजारी होऊ शकत नाहीत किंवा  त्यांचा कोरोनामुळे मृ.त्यू होऊ शकत नाही. कॅनडातील जर्नल एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन यामध्ये याविषयी अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

कॅनडा मधील टोरंटो यूनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी तब्बल 2,25,556 लोकांच्या ब्लड ग्रुपवर संशोधन केलं आहे. यामधील 1328 लोक कोरोनामुळे गंभीर आजारी होते. हे सर्व लोक ए, बी, किंवा एबी ग्रुपचे होते. या सर्वांचा आरएच फॅक्टर देखील पॉझीटीव्ह होता. तर ब्लड ग्रुप ओ किंवा ज्या लोकांचा आरएच फॅक्टर निगेटिव्ह आहे, अशा लोकांना खूप कमी प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी चीन मधील काही शास्त्रज्ञांनी देखील ब्लड ग्रुपनुसार कोरोनाच्या धोका पातळीचा अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार ए ब्लड ग्रुपवाल्या लोकांना कोरोनाची लागण लगेच होते. तर त्याप्रमाणात ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना कोरोनाची लागण हळुवार होते.

दरम्यान, कोरोना संक्रमित रुग्णामध्ये कोणती लक्षणं दिसतात, यावर जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टर सतत अभ्यास करीत आहेत. अशातच आता कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं समोर आली आहेत.

कोरोना रुग्णांमध्ये जठर आणि आतड्यांविषयी देखील लक्षणं बऱ्याचदा आढळल्याचं समोर आलं आहे. याविषयी बोलताना एम्समधील डॉक्टर म्हटले की, कोरोना संसर्गाच्या सामान्य लक्षणांमध्ये सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोकेदुखीचा समावेश आहे. परंतु कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना ओटीपोटात वेदना, अतिसार यांसारखी जठर आणि आतड्यांविषयी लक्षणे देखील आढळतात.

एम्स मधील डॉक्टरांचे असेही म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस रुग्णाच्या फक्त फुफुसांवरच हल्ला करत नाही. तर त्याचा परिणाम रुग्णाच्या इतर अवयवांवर देखील होतो. तसेच हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड किंवा यकृत समस्या आणि रक्त गोठणे यांसारख्या समस्या सुद्धा कोरोना रुग्णामध्ये अधिक दिसून येतात.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! एम्सच्या डॉक्टरांना कोरोना रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवी लक्षणं!

एकनाथ खडसेंच्या आरोपानंतर 1100 कोटींच्या ‘त्या’ घोटाळ्यावर गिरीश महाजन म्हणाले…

टाटा, ह्युंदाई आणि महिंद्राला जोरदार टक्कर; अवघ्या 4 लाखात मिळणार ‘ही’ SUV

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होणार? शरद पवार म्हणाले…

1500 रुपये घेऊन भारतात आले, टांगा चालवला आणि उभं केलं अरबोंचं साम्राज्य