क्वारंनटाईन सांगितलं तर तिथेही गप्प नाही… नमाज पठण सुरूच

अमरावती |  कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये, याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सध्या लोकांना क्वारन्टाईन होण्यास सांगितलं आहे. परंतू तेलंगणातल्या एका रूग्णालयात मुस्लिम समाजाच्या काही व्यक्ती क्वारन्टाईन असताना देखील दवाखान्यात एकत्र जमून नमाज पठण करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

हैदराबादमधील गांधी रुग्णालयातून हा प्रकार समोर आला आहे. या वृत्तानंतर खळबळ माजली आहे. या रुग्णालयात काही कोरोना संशयित मुस्लिम युवकांचे क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दवाखान्यातील काही रुग्णांनी तिथेच एकत्र येत नमाज अदा केली. विशेष म्हणजे सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. सोशल डिस्टन्सिग पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण, नागरिकांकडून याला सपशेल हरताळ फासला जात आहे.

दरम्यान, हैदराबादमधील एका रूग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाने अधिक कडक पावलं उचलली आहेत. मात्र असं असताना देखील नागरिक प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-शिधापत्रिका नसली तरी तीन महिन्यांचे धान्य मोफत मिळायला हवं- फडणवीस

-कोरोनाला संपवण्यासाठी रोहित पवारांनी केलं खास आवाहन, सुचवली नवी आयडिया!

-धारावीत सफाई कर्मचाऱ्यालाच करोनाची लागण; आरोग्य विभागाचं टेंशन वाढलं

-“मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं, महाराष्ट्रात कोणताही धार्मिक कार्यक्रम नको”

-कोरोनाच्या लढ्यात इंदोरीकर महाराजांची ‘लाखमोलाची’ मदत!