Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | कोरोना काळात महागाईचा भडका उडालेला पहायला मिळाला. लाॅकडाऊननंतर अनेक वस्तूंच्या किंमतींत वाढ झाली. या काळात लोकांना आर्थिक संकटांचा सामनाही करावा लागला.

कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच देशभरात पेट्रोल-डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

अशातच आता गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. मागील 75 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत.

केंद्र सरकारनं आता पेट्रोल आणि डिझेलची कपात कमी केल्यामुळे भारतीय कंपन्यांकडूनही नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी एक चांगली बातमी होती.

कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रीत करण्यासाठी अमेरिका महत्त्वपूर्ण पाऊल उचणार आहे. त्याचा फायदा भारतासोबतच इतर देशांना देखील होऊ शकतो.

इंधन दरवाढ सुरु राहिली तर पेट्रोल लवकरच 120 लीटरचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे. वाढता पेट्रोल आणि डिझेलचा दर पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  धक्कादायक! कोरोना लसीचे तब्बल ‘इतके’ डोस घेतल्यामुळे आजोबांवर FIR दाखल

  5 वर्षाखालील मुलांनी मास्क लावावं की नाही?; केंद्र सरकारनं जारी केले नवे नियम

  T20 World cupचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान येणार आमने सामने

  ‘…त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी’; किरण माने प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

  एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल