नवी दिल्ली | कोरोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. या कोरोना काळात अनेक गोष्टींच्या किंमती वाढल्या. त्यामुळे नागरिकांना महागाईचा सामना करावा लागला. या काळात सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं.
लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्याचं पहायला मिळालं. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. दिवाळीपूर्वी पेट्रोलने शंभरी पार केली होती. परंतु त्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.
आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत.
मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे.
काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील किरकोळ बदल वगळता देशातील महानगरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतच्या किमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. या इंधन दरवाढीमुळे नागरिकही हैराण झाले आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यास त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलवर होतो. कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रीत करण्यासाठी अमेरिका महत्त्वपूर्ण पाऊल उचणार आहे. त्याचा फायदा भारतासोबतच इतर देशांना देखील होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ देशात मास्क आणि लसीपासून सूटका, सरकारचा मोठा निर्णय
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या जीवनावर चित्रपट, ‘हे’ असणार नाव
त्वचेवर ‘अशी’ लक्षणं दिसल्यास करु नका दुर्लक्ष, असू शकतो Omicron?
संतापजनक! पुन्हा सुरु झालेल्या एसटीवर दगडफेक, प्रवासी थोडक्यात बचावले
राज्यात ओमिक्राॅनची तिसरी लाट येणार?; रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय वाढ