‘या’ देशात मास्क आणि लसीपासून सूटका, सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट थैमान घालत आहे.

सध्या जगभरात खळबळ माजवत असलेल्या ओमिक्राॅनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर लसीकरणावरही भर दिला जात आहे.

कोरोनाच्या धास्तीनं मास्क लावणं आणि लसीकरण करणं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळीकडे या गोष्टींवर जोर दिला जात असताना एका देशानं मात्र या गोष्टींवरचे निर्बंध काढले आहेत.

स्पेन सरकारने कोरोनाला सामान्य फ्लू मानलं आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र युरोपातील देशांमध्ये मास्क आणि लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येण्याची शक्यता आहे.

स्पेनचे पंतप्रधान प्राडो सांचेझ यांनी साथीच्या काळात लादलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. यासोबतच मृतांचा आकडाही कमी नोंदवला जात आहे, असं तेथील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

जगभरात सध्या कोरोनाचा नवीन व्हेरीयंट ओमिक्रॉनने हाहाकार माजवला आहे. त्यात कोरोना विषाणूनेही पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सध्या देशात चिंतेचं वातावरण आहे. यासोबतच अनेकांच्या मनात याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  कॉमेडी किंग कपिल शर्माच्या जीवनावर चित्रपट, ‘हे’ असणार नाव

  त्वचेवर ‘अशी’ लक्षणं दिसल्यास करु नका दुर्लक्ष, असू शकतो Omicron?

  संतापजनक! पुन्हा सुरु झालेल्या एसटीवर दगडफेक, प्रवासी थोडक्यात बचावले 

  राज्यात ओमिक्राॅनची तिसरी लाट येणार?; रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय वाढ

  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; सरकारकडून मिळणार खास गिफ्ट