मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.
यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.
शनिवार म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली होती. तसेत राविवाक म्हणजेच आजही पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचं समजतं आहे.
त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.15 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 106.23 रूपये आहे. तसेच दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 109.34 रूपये आहे आणि डिझेलचा दर 98.07 रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या-
कुत्र्याचा अनोखा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल
आर्यनच्या सुटकेवेळी चोरट्यांना सुळसुळाट, अबब… ‘या’ गोष्टींची झाली चोरी
“तुम्ही जे केले ते आता तुम्हाला भोगावं लागणार” आर्यनच्या सुटकेनंतर सर्वात मोठी प्रतिक्रिया
गुंतवणूकदारांना मोठा झटका; सेन्सेक्समधील घसरणीमुळे इतके लाख कोटी गमावले
आर्यनला सोडवण्यासाठी जुही चावला धावली, अशी केली शाहरुखला मोठी मदत