“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”

मुंबई |  राज्यात अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असतात. कोणत्याना-कोणत्या कारणावरून विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची खेळी सुरूच असते.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार सतत केंद्राकडून सत्तेचा दुरूपयोग केला जातो. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला जातो, असं वक्तव्य ते करतंच असतात. अशातच त्यांच्या या वक्तव्याला भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्युत्तर दिलं आहे.

सत्तेचा दुरूपयोग केंद्र सरकारकडून केला जात नाही. तर राज्यातील सरकारकडूनच केला जातो, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी शदर पवारांवर चांगलाच पलटवार केला आहे. दानवे पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं. परंतू तरीही शरद पवार यांनी राज्यात दुसरं सरकार स्थापन केलं. मग सरकार बनवलं हा सत्तेचा दुरूपयोग नाही का?, असा खोचक सवालही दानवे यांनी पवारांना केला आहे.

दरम्यान, त्यानंतर दानवे यांना दररोज वाढत चाललेल्या इंधन दराबाबत विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा या इंधन दराशी काहीही संबंध नाही. इंधन दराचा संबंध आंतरराष्ट्रीय दराशी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मोदी सरकार अशाप्रकारची इंधन दर वाढ करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा वाढ, वाचा आजचा दर

कुत्र्याचा अनोखा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आर्यनच्या सुटकेवेळी चोरट्यांना सुळसुळाट, अबब… ‘या’ गोष्टींची झाली चोरी

“तुम्ही जे केले ते आता तुम्हाला भोगावं लागणार” आर्यनच्या सुटकेनंतर सर्वात मोठी प्रतिक्रिया

गुंतवणूकदारांना मोठा झटका; सेन्सेक्समधील घसरणीमुळे इतके लाख कोटी गमावले