पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, वाचा आजचे ताजे दर

मुंबई | कोरोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. या कोरोना काळात अनेक गोष्टींच्या किंमती वाढल्या. त्यामुळे नागरिकांना महागाईचा सामना करावा लागला. या काळात सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं.

सरकारनं लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्याचं पहायला मिळालं. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच देशभरात पेट्रोल-डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

पेट्रोल डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. दिवाळीपूर्वी पेट्रोलने शंभरी पार केली होती. परंतु त्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.

या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतच्या किमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. या इंधन दरवाढीमुळे नागरिकही हैराण झाले आहेत

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यास त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलवर होतो. कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रीत करण्यासाठी अमेरिका महत्त्वपूर्ण पाऊल उचणार आहे. त्याचा फायदा भारतासोबतच इतर देशांना देखील होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

  समीर वानखेडेंचा मुंबईत रेस्ट्रो बार, फोटो शेअर करत नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

  लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

  अमृता फडणवीसांचं रिमेक गाणं! ‘या’ प्रसिद्ध गाण्यावर धरला ठेका; पाहा व्हिडीओ

 ‘मला वाटलं रिषभ धोनीसारखा खेळेल पण…’; ‘या’ दिग्गज खेळाडूने व्यक्त केली नाराजी

 कोरोनातून बरे झालेल्यांना ‘या’ आजाराचा धोका; आली धक्कादायक माहिती समोर