समीर वानखेडेंचा मुंबईत रेस्ट्रो बार, फोटो शेअर करत नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

मुंबई | मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे. याप्रकरणावरुन अनेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळंच राजकीय वळण मिळालं आहे.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आल्यावर हे प्रकरण आणखीनच प्रकाशझोतात आलं. यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याप्रकरणात अडकत गेले. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले.

ड्रग्ज प्रकरणापासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात खुलास्यांचा सपाटा लावला आहे. रोज नवनवीन खुलासा करत ते गौप्यस्फोट करत असतात.

अशातच नवाब मलिक यांनी ट्विट करत आणखी एक खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांचा मुंबईत एक बार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

नवी मुंबईतील सद्गुरु रेस्टो बारचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत नवाब मलिक यांनी म्हटलं की, नोकरी सुरू असताना शासकीय अधिकारी व्यवसाय करू शकत नाही त्यामुळे वानखेडेंवर कारवाई करावी.

ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधलाय. समीर दाऊद वानखेडे यांचे आणखी एक फर्जीवाडा केंद्र, म्हणत मलिकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

मुंबईमधील वाशी येथे हा बार आहे. याविषयी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, ‘माझ्या नावावर बारचा परवाना असणं यात बेकायदेशीर काहीही नाही. 2006 साली सरकारी सेवेत येतानाच मी जी स्थावर मालमत्तेची माहिती दिली आहे.

दरम्यान, नवाब मलिकांच्या या ट्विटनं एकच खळबळ उडवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप आपल्याला पहायला मिळणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

  अमृता फडणवीसांचं रिमेक गाणं! ‘या’ प्रसिद्ध गाण्यावर धरला ठेका; पाहा व्हिडीओ

 ‘मला वाटलं रिषभ धोनीसारखा खेळेल पण…’; ‘या’ दिग्गज खेळाडूने व्यक्त केली नाराजी

 कोरोनातून बरे झालेल्यांना ‘या’ आजाराचा धोका; आली धक्कादायक माहिती समोर

“मला खूप आनंद झालाय, पण हे विरोधी पक्षांचं यश नाही”