सर्वसामान्यांना मोठा दिलासा! वाचा पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?

मुंबई | अलिकडे काही वर्षांमध्ये पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

मात्र, तुर्तास तरी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज सलग तेराव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. सध्या देशांतर्गत अनेक शहरांमध्ये इंधनांच्या किंमती हाय पातळीवर आहेत.

दररोज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान तेल कंपन्यांकडून इंधनांचे नवीन दर जारी केले जातात. आज देखील गुड रिटर्न्स वेबसाईटने हे दर जारी केले आहेत. यात कोणतेही बदल पाहायला मिळाले नाहीत.

मुंबई शहरात आज पेट्रोलचा दर 97 रुपये 57 पैसे प्रती लीटर आहे. गेल्या 13  दिवसांपासून हाच दर स्थीर आहे. तसेच डिझेलचा दर 87 रुपये 67 पैसे प्रती लीटर आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दर स्थीर असल्याने सर्वसामान्यांना तुर्तास तरी दिलासा मिळत आहे.

सध्या आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. ओपेक प्लस देशांच्या बैठकीनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पेट्रोलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 60 टक्के कर आकारला जातो. तसेच डिझेलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 54 टक्के कर आकारला जातो. हे कर सरकारने कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर खाली येवू शकतात.

पेट्रोल डिझेलचे वाढते दर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. इंधनाच्या वाढत्या भावावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. मात्र, सामान्य नागरीकच यामध्ये चेपला जात आहे.

पेट्रोल दरवाढ हा एक राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. पेट्रोल दरवाढीवरुन नेटकरी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच देशभरातून इंधनाचे दर कमी व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘तुम्ही सरकारचे कुत्रे आहात’; माजी मंत्री आणि पोलिसांच्यात राज्यसेवा परीक्षांवरुन वाद; पाहा व्हिडिओ

‘आता चाय पे चर्चा होऊनच जाऊद्यात’; नाईक कुटुंबियांचं भाजपला खुलं आव्हान

हवेत उडणारी कासवं तुम्ही पाहिलीत का? नक्की पाहा हा दुर्मिळ व्हिडिओ

तिने नवऱ्याला खुर्चीला बांधलं, पॉ.र्न व्हिडिओ दाखवले अन् पुढे जे केलं त्याने महाराष्ट्र हा.दरला!

कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांनी कसं पकडलं? संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद; पाहा व्हिडिओ