हा कोरोना पसरवतोय म्हणत तबलिकी जमातच्या एकाला बेदम मारहाण; रूग्णालयात मृत्यू

नवी दिल्ली |  दिल्लीच्या बवानामध्ये राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरूणाला कोरोना पसरवोय या अफवेतून जबर मारहाण करण्यात आली. दुर्दैवी म्हणजे उपचारांदरम्यान त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

संंबधित तरूणाने कोरोना पसरवल्याचा कट रचला आहे, या संशयातून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीसांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

मारहणीत मृत्यू पावलेला तरूण हा तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमासाठी मध्य प्रदेश मधल्या भोपाळला गेला होता. 45 दिवसांनंतर तो परत दिल्लीला आला. मात्र तो गावात परत येताच कोरोना पसरवण्याच्या उद्देशाने तो आला आहे,असा भ्रम पसरवत त्याला बेदम मारहाण केली गेली.

दरम्यान, हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास चालू आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबईत कोरोनाबाधितांचा चढताक्रम; महापालिका दक्षिण कोरियाकडून विकत घेणार 1 लाख किट्स

-जितेंद्र आव्हाडांची हकालपट्टी करा; भाजपची राज्यपालांकडे मागणी

-आम्ही ‘मुख्यमंत्र्यांनाच’ उत्तरदायी आहोत – जितेंद्र आव्हाड

-मोदी सरकार धाडसी निर्णयाच्या तयारीत; आर्थिक आणीबाणी लागू होणार?

-“तबलिगींच्या कार्यक्रमाला केंद्रिय गृहमंत्रालयाने कशी काय परवानगी दिली”