मुंबईत कोरोनाबाधितांचा चढताक्रम; महापालिका दक्षिण कोरियाकडून विकत घेणार 1 लाख किट्स

मुंबई | देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा फैलाव अधिक वेगात होत आहे.  मुंबईत वाढता कोरोनाग्रस्तांचा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिकेने मोठं पाऊल उचललेलं आहे. मुंबई महापालिकाने दक्षिण कोरियाकडून 1 लाख किट्स विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईत रॅपिड टेस्टिंग सुरु होणार आहे.

रॅपिड टेस्टमुळे इन्फेक्शन झालं आहे का याची माहिती मिळते. इन्फेक्शन झाले असल्यास त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.

दरम्यान, मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या लॉकडाऊन असताना देखील प्रचंड मोठ्या संख्येने वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत आता संचारबंदीची मागणी होऊ लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जितेंद्र आव्हाडांची हकालपट्टी करा; भाजपची राज्यपालांकडे मागणी

-आम्ही ‘मुख्यमंत्र्यांनाच’ उत्तरदायी आहोत – जितेंद्र आव्हाड

-मोदी सरकार धाडसी निर्णयाच्या तयारीत; आर्थिक आणीबाणी लागू होणार?

-“तबलिगींच्या कार्यक्रमाला केंद्रिय गृहमंत्रालयाने कशी काय परवानगी दिली”

-पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी