“पोलिसांनी आज सकाळी मला पुन्हा मारलं, माझा जीव धोक्यात आहे”

मुंबई | अलिबाग पोलिसांनी बुधवारी सकाळी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना ता.ब्यात घेतलं आहे. इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आ.त्मह.त्याप्रकरणी कलम 306 च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णव गोस्वामींला अ.टक केलं आहे.

अर्णव यांच्या वरळी येथील राहत्या घरातून सचिन वाझे यांच्या पथकाने त्यांना अ.टक केलं आहे. गोस्वामी यांनी अन्वय नाईक यांना आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त केलं असल्याचा आ.रोप नाईक यांच्या कुटुंबियांनी केला होता. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर गु.न्हा दाखल करण्यात आला होता. अर्णव गोस्वामी सध्या तळोद्याच्या कारागृहात आहेत.

गोस्वामी यांना तळोदा का.रागृहात हलविण्यात आल्याची माहिती देत रिपब्लिक टीव्हीने काल अर्णव गोस्वामी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्णव गोस्वामी पोलिसांच्या गाडीतूनच रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये गोस्वामी यांनी पुन्हा पोलिसांवर गंभीर आ.रोप केले आहेत.

माझ्या जिवाला धोका आहे. आज सकाळी 6 वाजताच मला उठवण्यात आलं. यानंतर मला माझ्या वकिलांशी बोलण्याची परवानगी नाही, असं सांगण्यात आलं. यानंतर मला जोराने धक्का देत मला मा.रहा.णही केली. देशातील लोकांना सांगा माझा जीव धोक्यात आहे, असं अर्णव गोस्वामी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तसेच यावेळीअर्णव गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे देखील मदतीची मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाला सांगा मला तुरुंगात मा.रहा.ण झाली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा. मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयानं माझी मदत करावी, असंही गोस्वामी यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना अट.क केल्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. स्थानिक कोर्टाने अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांची को.ठडीची शिक्षा सुनावली आहे. यानंतर आता गोस्वामी यांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेत एक याचिका सादर केली आहे.

या याचिकेत अर्णव गोस्वामी यांनी मुंबई पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अर्णव गोस्वामी यांनी या याचिकेत दावा केला आहे की, पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने त्याला काहीतरी द्रव्य पाजलं. पोलिसांनी पाजलेल्या या द्रव्यामुळे माझा जीव गुदमरला.

तसेच अ.टकेच्यावेळी मुंबई पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला जाड बुटाने मा.रहा.ण केली. यामुळे माझ्या डाव्या हाताला जखम झाली आहे. तसेच पोलिसांच्या मा.रहा.णीमुळे माझ्या मणक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे, असा आरोप अर्णव गोस्वामी यांनी याचिकेत केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जो बायडन यांना शुभेच्छा देत रोहित पवारांचा भाजपवर जोरदार निशाणा!

कंगना पुन्हा बरळली! थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना गजनीची उपमा देत म्हणाली…

‘माझा नवरा बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींना…’; स्वतःच्या पतीविषयीच अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

रेखानं ‘या’ अभिनेत्यासोबत केलं होतं लग्न, मात्र अवघ्या काही दिवसांतच तुटलं नातं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

“पोलिसांनी मला जाड बुटाने मा.रहान करत जबरदस्तीने जीव गुदमरवणारे द्रव्य पाजलं”