इंदुरीकर महाराजांविरोधात गावकरी आक्रमक; घेतली पोलिसांत धाव

बीड| किर्तनकार निवृती महाराज इंदुरीकर अर्थात इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) हे त्यांच्या किर्तनामुळे आणि विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. तसेत त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याने त्यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी देखील आहे.

बीड जिल्ह्यातील कळंबकर (Kalambakar) गावात इंदुरीकर महारांजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ते किर्तनासाठी त्या गावात वेळेवर पोहोचले नाहीत. त्यामुळे गावकरी संतापले.

संतप्त गावकऱ्यांनी इंदुरीकर महारांजाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी केली आणि त्याप्रमाणे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

गावकरी इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार करण्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यात पोहोचले. संतप्त गावकऱ्यांना या प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले, महारांजानी त्यांना किर्तनाची तारीख दिली होती. पण त्यांनी वेळ पाळली नाही, असे ते म्हणाले.

आम्ही ते येणार म्हणून गावभर जाहीरात केली. रिक्षावर भोंगा लावून आम्ही गावाला कळविले. पण ऐनवेळी त्यांनी असा घोळ घातला. म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावे लागले, असे गावकरी म्हणाले.

त्याचबरोबर इंदुरीकरांच्या या कार्यक्रमासाठी गावाकऱ्यांनी वर्गणीतून एक ते दीड लाख रुपये खर्च केला आहे. पण ऐनवेळी महाराजांनी मी किर्तनाला येणार नाही कळविल्याने, त्यांनी आमची फसवणूक केली, असे गावकरी म्हणाले.

इंदुरीकर महाराज कळंबकर गावी न जाता दुसऱ्या गावी किर्तनाला गेले अशी अफवा पसरली होती. त्यामुळे ग्रामस्थ अधिकच संतापले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली.

महत्वाच्या बातम्या – 

अजित पवारांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, येवढा अकांडतांडव…

बिल्कीस बानो प्रकरणात गीतकार जावेद अख्तर आक्रमक, दिली संतप्त प्रतिक्रिया

मुंबईवर पुन्हा 26/11 चे सावट? वाचा सविस्तर वृत्त

‘तुमच्या मनात येईल ते…’, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अजित पवारांनी सुनावले खडे बोल

‘हल्ला केला त्याच ठिकाणी सभा घेणार, दम असेल तर…’ सामंताचा हल्लेखोरांना इशारा