गोविंदांना आरक्षण देण्यावरुन तृप्ती देसाई संतापल्या आणि मुख्यंत्र्यांकडे केली मोठी मागणी

मुंबई | मुख्यमंत्री एखनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच गोविंदापथकातील तरुणांना खेळ कोट्यातून आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यांना सरकारी नोकरीत खेळ कोट्यातून आता नोकरी मिळू शकते.

त्यावरुन राज्यात वादाला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्र्यांवर या निर्णयावरुन टीका केली. पवार म्हणाले, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नसतो.

या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी गोविंदांना देण्यात येणाऱ्या आरक्षणावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट करत आपली भूमिका मांजली आहे.

गोविंदांना आरक्षण देण्यापेक्षा रस्त्यावर डोंबाऱ्यांचा खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या, असे तृप्ती देसाई यांनी म्हंटले आहे. वर्षातून एक दिवस दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांना आरक्षण देण्यापेक्षा रस्त्यावर रोज साहसी खेळ करणाऱ्या डोंबाऱ्यांना आरक्षण द्या असे देसाई म्हणाल्या. तसेच त्यांना आरक्षण दिल्याने तुम्हाला आशिर्वाद तरी मिळतील, असे देखील देसाई म्हणाल्या.

मागील दोन वर्षे कोरोनाने जगात थैमान घातले होते. त्यामुळे सर्वच सणांवर निर्बंध आले होते. गेली दोन वर्षे उत्सवातील मजा करायची राहून गेली होती. आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने पुन्हा सर्व सणांना सुरुवात झाली आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर झालेल्या दहीहंडीला शासनाने गोविंदांचा विमा उतरविला होता आणि त्यांना बरीच सूट दिली होती. त्यामुळे यंदाची दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडली आणि आता वादाला सुरुवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

इंदुरीकर महाराजांविरोधात गावकरी आक्रमक; घेतली पोलिसांत धाव

अजित पवारांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, येवढा अकांडतांडव…

बिल्कीस बानो प्रकरणात गीतकार जावेद अख्तर आक्रमक, दिली संतप्त प्रतिक्रिया

मुंबईवर पुन्हा 26/11 चे सावट? वाचा सविस्तर वृत्त

‘तुमच्या मनात येईल ते…’, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अजित पवारांनी सुनावले खडे बोल