‘या’ भाजप आमदाराच्या भावाच्या मॅरेज हॉलवर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

नवी दिल्ली | कोरोनासारख्या विषाणूने थैमान घातलं असताना पोलीस प्रशासन कोरोनाविरूद्धच्या लढ्यात मोठ्या हिमतीने लढत आहेत. मात्र देशातील काही लोक सुधारण्याचं नाव घेत नाय्येत.आणदाराच्या  उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात एक मोठं सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

बरेडी जिल्ह्यातील बहेडी विधानसभेचे भाजपचे आमदार छत्रपाल सिंह यांच्या भावाच्या लग्नाच्या हॉलमध्ये चालत असलेलं सेक्स रॅकेटवर पेलिसांनी छापा टाकला आहे. रुहेलखंड विद्यापीठाच्या डोरा वळणावर वेद एव्हेन्यू बॅनक्वेट हॉलवर मंगळवारी छापा टाकण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून पश्चिम बंगालमधील आठ आणि दिल्लीतील एका मुलीला ताब्यात घेतलं आहे. यासंदर्बात पोलीस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी माहिती दिली आहे.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात काही तरूणांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आहे. या तरूणांकडून पोलिसांना गर्भ निरोधक आणि उत्तेजक औषधे सापडली आहेत. तेथी एकूण मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वेद एव्हेन्यू बॅनक्वेट हॉल हा भाजपचे आमदार छत्रपाल गंगवार यांचे भाऊ चमनलाल गंगवार यांचा आहे.

दरम्यान, चमनलाल गंगवार हे सीबीगंज इंटर कॉलेजमध्ये प्राचार्य होते. त्यांनी हा मॅरेज हॉल भाड्याने घेतला होता. देह व्यापार करणाऱ्या मुलींसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी रहाण्यासाची व्यवस्था केली गेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

चांगली बातमी! पुण्यात आज दिवसभरात 2 हजारांहून अधिक रूग्णांची कोरोनापासून सुटका

कौतुकास्पद! पुण्यात हॉटेलमध्ये काम करून रात्रशाळेत शिक्षण घेत ‘तीनं’ मॅट्रीकमध्ये मिळवलं यश!

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला, देशात काय सुरू आणि काय बंद?; वाचा एका क्लिकवर

रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकिता लोखंडे म्हणाली

धक्कादायक! ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या पतीने गळफास घेत केली आत्महत्या!